सुंदर फुलाचा सुगंध घेतला आणि तरुणींची झाली भयंकर अवस्था

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एखाद्या सुंदर फुलाचा सुगंध मनमोहकच असेल असे नाही. काहीवेळेला सुंदर दिसणाऱ्या फुलांचा सुगंध धोकादायकही असू शकतो. दोन तरुणींसोबत असेच काहीसे झाले आहे. या तरुणींना समोर सुंदर फुल दिसल्याने त्याचा सुगंध घेतला आणि त्यानंतर त्यांची जी अवस्था झाली त्याने त्या भयंकर घाबरल्या.

टिकटॉक फेम, गीतकार आणि गायक रफायला वेमन हिच्यासोबत हा प्रसंग घडला आहे. डेविल ब्रिथ असे त्या फुलाचे नाव आहे. रफायला आणि तिची खास मैत्रीण एका दुसऱ्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला जात होत्या. दरम्यान मध्येच त्यांना एक पिवळ्या रंगाचे सुंदर फूल दिसले आणि दोघींनीही त्याचा सुगंध घेण्यासाठी नाकाजवळ नेले, मात्र अवघ्या काहीवेळात त्यांच्यासोबत काहीतरी वेगळं होत असल्याची जाणीव झाली. त्यांचे डोकं जड झाले होते. तरीही त्या फुलासोबत फोटो काढला. मात्र फुलाचा सुंगध घेतल्यावर काहीतरी वेगळी चित्र, आवाज ऐकू येऊ लागले. जे फार भयंकर होते. तिने व्हिडीओच्या माध्यमातून माहिती दिली.

या घटनेनंतर त्या दोघी मैत्रीणीच्या वाढदिवसासाठी तिच्या घरी गेल्या, तेव्हा अचानक दोघींची तब्येत बिघडली. तिथून निघाल्यावर रफायला घरी येऊन झोपली. मात्र झोपेत काहीतरी विचित्र स्वप्न पडत होती आणि पहिल्यांदाच स्लीप पॅरेलिसीसचा तिने अनुभव घेतला. दुसऱ्या दिवशी रफायलाने गुगलवर त्या फुलाचा शोध घेतला तेव्हा तिला ते विषारी फूल असल्याचे लक्षात आले. त्या फुलाचे नाव डेविल ब्रिथ असल्याचे कळले. जर या फुलाचा तिने आणखी जास्त वेळ सुगंध घेतला असता तर त्याचा भयंकर परिणाम झाला असता.

यूएस डिपार्टमेण्ट ऑफ स्टेटनुसार या फुलामुळे कोलंबियात प्रत्येक वर्षी जवळपास 50 हजार लोकांना रुग्णालयात भरती करण्याची वेळ येते. जगातील सर्वात भयानक औषधांपैकी एक मानले जाते.