मध्यरात्री घरात घुसून महिलेला मारहाण

अहमदपूर येथील भारत कॉलनी भागात राहणार्‍या महिलेच्या घरात घुसून तिघांनी मारहाण केल्याप्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिता राम जाधव यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, 26 नोव्हेंबर रोजी पहाटे 1 वाजता घराच्या दाराची कडी वाजल्यामुळे दार उघडले. तेव्हा दारात ललिता काळे, गणेश हणमंते आणि मम्मू शेख उभे होते. त्यांनी चाकूर पोलीस ठाण्यात आमच्या विरुद्ध दिलेली तक्रार मागे घे, असे म्हटले असता आपण तक्रार मागे घेणार नाही असे त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी एक बाटली फिर्यादीच्या अंगावर फेकली. त्यामधील द्रव पदार्थ पायावर पडल्यामुळे पायाची आग होऊ लागली. धारदार वस्तूने फिर्यादी अनिता हिच्या उजव्या पायावर, डाव्या मांडीवर, पोटावर लाथाबुक्यांनी मारहाण केली. अनिताच्या गळ्यातील पाच ग्रॅमची सोन्याची साखळी काढून घेतली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.