
नवजात अर्भकाचा त्याग करून महिलेने पळ काढल्याची घटना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात घडली. रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 40 समोरील शौचालयाच्या लादीवर ते अर्भक रडत होते. घडल्या प्रकरणी टिळक नगर पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार हे टिळक नगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. सोमवारी ते रात्रपाळी डय़ुटीला होते. अपघात विभागात काम करत असताना त्याच्याजवळ एक जण आला. त्याने त्याची ओळख त्याना सांगितली. रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 40 समोरील शौचालयात गेले. तेथे शौचालयाच्या लादीवर नवजात अर्भक रडत असल्याचे दिसले. त्यानंतर तक्रारदार याने रुग्णालयातील परिचारिकेला बोलावले. त्या अर्भकाला एनआयसीयूमध्ये दाखल केले. त्या अर्भकाची प्रकृती ठीक असल्याचे पोलिसानी सांगितले. अज्ञात महिलेने त्या अर्भकाला जन्म देऊन त्याला रुग्णालयात सोडले. त्यानंतर महिलेने पळ काढल्याचा पोलिसांना संशय आहे.


























































