मूल नसल्याच्या कारणावरून हुंड्याची मागणी करत विवाहितेचा छळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, लातूर

मूल होत नसल्याच्या कारणावरून दवाखान्याचा आणि मोटारसायकलसाठी 2 लाख रुपये हुंडा मागत विवाहितेचा छळ करण्यात आला आहे. या प्रकरणी जळकोट येथील पोलीस ठाण्यात 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अलकाबाई बालाजी कदम (रा.चेरा) यांनी जळकोट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 29 एप्रिल 2008 रोजी बालाजी मधुकर कदम (रा. मोहिजा परांडा ता. कंधार) याच्याशी फिर्यादी महिलेचे लग्न झाले होते. चार वर्षांपर्यंत सासरच्या लोकांनी चांगले वागवले. परंतु नंतर तू वांझ आहेस, तुला मुल होत नाही, दवाखान्यासाठी खर्च करावा लागला, मोटारसायकल घेण्यासाठी माहेरवरून 2 लाख रुपये आण असं म्हणत तिचा छळ करण्यात आला. तिला घरातून हाकलून लावण्यात आले.

या प्रकरणी अलकाबाई हिच्या फिर्यादीवरून बालाजी मधुकर कदम, चंद्रकला मधुकर कदम, पुष्पा ज्ञानेश्वर पाटील, स्वाती परमेश्वर मुळे, ज्ञानोबा भास्कर कदम, सोपान विठ्ठल कदम, भास्कर विठ्ठल कदम, पंडीत वैजनाथ कदम, परमेश्वर विठ्ठल मुळे, बळीराम देवीदास कदम, स्वप्नील बाबुराव कदम, ज्ञानेश्वर अभंगराव पाटील यांच्या विरुद्ध) जळकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.