नवऱ्याचे गुप्तांग कापून पत्नीने केली पतीची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओडिशातील जाजपूर जिल्ह्यात एक अतिशय खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका 33 वर्षीय महिलेने तिच्या नवऱ्याचे गुप्तांग कापून त्याची हत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशातील पूबोला मुंडसाही गावात शुक्रवारी रात्री ही घटना घडली. आरोपी महिला कुनी चंपिया हिने शुक्रवारी रात्री धारदार शस्त्राने पतीची हत्या केली. राजू चंपिया (39) असे या मृत व्यक्तिचे नाव आहे. आरोपी महिलेने तिच्या पतीचे गुप्तांग कापले त्यानंतर त्याची हत्या केली. पळून जाण्यापूर्वी तिने त्याचे गुप्तांग फेकून दिले. शनिवारी सकाळी रुणगुरुंगा कालव्याजवळील निर्जन ठिकाणी काही लोकांनी मृतदेह पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्याच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. या घटनेची माहिती स्थानिकांनी तात्काळ सुकिंदा पोलीस ठाण्यात दिली.

पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. तेव्हा तपासादरम्यान पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मृतदेहाचे गुप्तांग कापण्यात आले होते. राजू चंपियाच्या कुटुंबियांनी सुकिंदा पोलीस ठाण्यात आरोपी महिलेवर खून केल्याची तक्रार दाखल केली. राजूचा धाकटा भाऊ जयराम चंपिया यांनी सांगितले की, तीन वर्षांपूर्वी राजूने कराडगडिया येथील कुनी चंपिया हिच्याशी पहिली पत्नी गेल्यानंतर लग्न केले होते. तिच्याशी लग्न केल्यानंतर तो कादरगडिया गावात तिच्या माहेरी राहात होता. पोलिसांनी आरोपी महिलेवर गुन्हा दाखल केला असून आरोपींना पकडण्यासाठी शोधमोहिम सुरू आहे, असे सांगितले आहे.