जेईई अ‍ॅडवॉन्स्डमध्ये दिसली महिला पॉवर; 10 हजार 107 मुली ठरल्या पात्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंजिनीअरिंग प्रवेशासाठी सर्वात जास्त कठीण समजली जाणारी जेईई अॅडवॉन्स्ड परीक्षा 2026 ची आकडेवारी समोर आली आहे. आयआयटी रुरकीच्या संयुक्त कार्यान्वयन समितीच्या अहवालानुसार, या वर्षी जेईई अॅडवॉन्स्ड परीक्षा पास करण्यामध्ये मुलींची टक्केवारी चांगलीच वाढली आहे. यंदा 10 हजार 107 मुलींनी जेईई अॅडवॉन्स्ड परीक्षा पास केली आहे.

या वर्षी जेईई अॅडवॉन्स्डचे दोन्ही पेपर देणाऱया 1 लाख 79,694 उमेदवारांपैकी 56,880 जणांनी परीक्षा पास केली. जेईई अॅडवॉन्स्ड 2026 मध्ये एपूण 43,112 मुलींनी नोंदणी केली होती. यातील 40,562 मुलींनी दोन्ही पेपर दिले.

एससी उमेदवारांचे प्रदर्शन भारी

या परीक्षेत एससी उमेदवारांचे प्रदर्शनही भारी राहिले आहे. 2025 मध्ये एससी उमेदवारांचा क्वॉलिफिकेशन रेट 40.41 टक्के होता. 2026 मध्ये वाढून 50.16 टक्के झाला आहे. प्रत्येक दोन विद्यार्थ्यांमध्ये एक एससी उमेदवार आहे. एससी क्वॉलिफायर्सची संख्या 2025 मध्ये 12,499 होती. ती आता 15,856 झाली आहे.