महिला आयोगाचे पथक मणिपूरला पोहोचलं, पीडित महिलांशी संवाद साधणार

राष्ट्रीय महिला आयोगाचे एक पथक मणिपूरला पोहोचले आहे. मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करत धिंड काढण्यात आली होती ज्यानंतर त्या दोघींवर सामूहीक बलात्कार करण्यात आला होता. या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने ही बाब संपूर्ण जगाला कळाली होती. मणिपूरमध्ये दोन जमातींमध्ये सुरू असलेल्या संघर्षात महिलांवर अनन्वित अत्याचार करण्यात आल्याचे आरोप करण्यात येत आहेत. या आरोपांची शहानिशा करण्यासाठी आणि पीडितांशी बोलण्यासाठी आयोगाचे पथक मणिपूरला पोहोचले आहे.