महिलांची आयपीएल लय भारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएलपेक्षाही महिलांची प्रीमियर लीग अर्थातच डब्ल्यूपीएल लय भारी ठरली. बीसीसीआयने  महिलांच्या पाच संघांचे मालकी हक्क 4669.99 कोटी रुपयांना विकल्याचे जाहीर केले. आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेल्या गौतम अदानी यांनी मुकेश अंबानींपेक्षा 376 कोटींची सर्वोच्च बोली लावत अहमदाबाद संघाची मालकी आपल्याकडे घेतली. डब्ल्यूपीएलच्या उद्घाटनीय स्पर्धेत मुंबई, दिल्ली, बंगळुरू, अहमदाबाद आणि लखनौ हे पाच संघ असतील.

अहमदाबाद 1289 कोटींचा

आज बीसीसीआयने डब्ल्यूपीएलच्या मालकी संघांची नावे जाहीर करताना त्यासाठी मोजल्या गेलेल्या रकमांची घोषणा केली तेव्हा सर्वांचा भुवया उंचावल्या. मुंबई इंडियन्सची मालकी असलेल्या मुकेश अंबानींच्या इंडियाविन स्पोर्ट्स प्रा. लि. या पंपनीने 912.99 कोटी रुपयांना मुंबई महिला संघाची मालकी आपल्याकडे खेचली तर अंबानींपेक्षा तब्बल 376 कोटी म्हणजेच 1289 कोटी रुपये मोजत अदानी स्पोर्ट्सलाइन प्रा. लि.ने अहमदाबाद संघाची मालकी मिळवली.

 महिला आयपीएल नव्हे वुमन्स प्रीमियर लीग

आयपीएलच्या धर्तीवर सुरू होणाऱया महिलांच्या लीगबाबत बीसीसीआयने खुलासा करताना ही लीग महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) या नावाने ओळखली जाणार असल्याचे जाहीर केले.

आयपीएलच्याच मालकांची सरशी

महिला प्रीमियर लीगच्या पाच संघांचे मालक जाहीर करताना आयपीएलचे मालक डब्ल्यूपीएलचे मालक झाल्याचे समोर आले. मुंबईचा संघ अंबानी यांनी मिळविला तर दिल्ली पॅपिटल्सच्या पंपनीने दिल्लीचे हक्क मिळविण्यात यश मिळविले तर रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाच्या मालकांनी डब्ल्यूपीएलच्या बंगळुरू संघाचीही मालकी मिळविली. आयपीएलमध्ये संघ विकत घेण्यात यश न लाभलेल्या गौतम अदानींनी अहमदाबाद संघ विक्रमी किमतीवर विकत घेतला. पॅप्री ग्लोबलने लखनौ संघाची मालकी मिळविण्यात बाजी मारली. बीसीसीआयने जाहीर केलेल्या यादीनुसार आयपीएलच्या मालकांनीच डब्ल्यूपीएलचेही मालकी हक्क आपल्याकडे राखण्यात यश मिळविल्याचे दिसत आहे.

संघ खरेदीसाठी मोजले अब्जावधी

डब्ल्यूपीएलचा सर्वात महागडा संघ अहमदाबाद ठरला आहे. अदानींच्या पंपनीने 1289 कोटी रुपयांना तो संघ विकत घेतला. मुंबईचा संघ विकत घेण्यासाठी अंबानींनी 912.99 कोटी रुपये मोजले. बंगळुरूसाठी रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रा. लि. ने 901 कोटी, दिल्लीसाठी जेएसडब्ल्यू जीएमआर क्रिकेट प्रा. लि.ने 810 कोटी तर पॅप्री ग्लोबल होल्डिंग्जने लखनौसाठी 757 कोटींची रक्कम मोजल्याचे बीसीसीआयने आज जाहीर केले.