पाकिस्तानवरील बंदीच्या भूमिकेवर आम्ही ठामच! विनोद राय यांचे स्पष्ट मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
vinod-rai-bcci

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

दहशतवाद्यांना पोसणाऱया पाकिस्तानवरील बंदीच्या निर्णयावर आम्ही ठाम असल्याचे स्पष्ट मत बीसीसीआय प्रशासकीय समिती चेअरमन विनोद राय यांनी गुरुवारी व्यक्त केले, मात्र वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानवरील बहिष्कारावर त्यांनी काहीही बोलणे टाळले.

वर्ल्ड कपला अद्याप चार महिने बाकी आहेत. सुरक्षेबाबत आम्ही चिंता व्यक्त केली होती. आयसीसीने त्यावर आश्वासन देताना सांगितले की, आम्ही सर्व संघांतील खेळाडूंसह सपोर्ट स्टाफला भक्कम सुरक्षा व्यवस्था पुरवू, असे विनोद राय यावेळी म्हणाले. या महिनाअखेरीस बीसीसीआय व आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्यामध्ये बैठक होणार असून त्यामध्ये पाकिस्तानसह ‘वाडा’बाबतही चर्चा होणार आहे. दहशतवादासारख्या गंभीर विषयावर आम्ही आयसीसीशी बोललो आहोत. याप्रकरणी आयसीसीने गांभीर्याने विचार करायला हव. असे राय म्हणाले.