जगातील सर्वात मोठा ससा गेला चोरीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगातील सर्वात लांबीचा ससा म्हणून गिनीज बुकात नोंद झालेल्या डेरियस या सशाची त्याच्या मालकाच्या घरातून चोरी झाली आहे. एकीकडे पोलीस डेरियसचा शोध घेतायत, तर दुसरीकडे मालकाने या सशाचा शोध घेणाऱयाला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. शनिवारी रात्री काही लोकांनी हा ससा चोरला होता. डेरियसची लांबी 129 सेमी आहे. 2010 मध्ये त्याची ‘गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद सर्वात लांबीचा ससा म्हणून नोंद झाली होती. ज्या दिवशी हा ससा चोरीला गेला तो आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा दुःखद दिवस होता असे डेरियसचे मालक एनेट एडवर्ड्स यांनी सांगितले आहे. वेस्ट मर्सिया पोलिस डेरियसचा शोध घेत असून त्यासाठी पोलिसांनी हेल्पलाईन नंबरही जारी केला आहे.