अकाली वृद्धत्व टाळायचे आहे….करा ‘हा’ सोपा उपाय…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अलिकडे चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी आणि बदललेल्या जीवनशेैलीमुळे वयाच्या 30-40व्या वर्षीच चेहऱ्यावर किंवा शरीरावर सुरकुत्या दिसायला सुरूवात होते. पण या अकाली वृद्धत्वावर उपाय करून ते टाळता येते. हिंदूस्तानच्या काही संशोधकांनी अकाली वृद्धत्वाची लक्षणे नियंत्रणात आणण्याठी एक उपाय शोधला आहे.

वैद्यकशास्त्र प्रगत असूनही, निरोगी आणि दिर्घायुषी होण्यासाठी अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. योग्य आहाराचे पथ्य न पाळल्यास, लठ्ठपणा, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, मधुमेह, कर्करोग, आतड्याच्या रोगांना वयाच्या तिशीतच अनेकांना सामोरे जावे लागते. हिंदूस्तान आणि चीनसारख्या जास्त लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये अशा रोगांचे प्रमाण जास्त आहे.

हिंदूस्तानातील काही शास्त्रज्ञांनी मिळून दह्याचा एक प्रकार विकसित केला आहे. ज्यामध्ये लॅक्टोबॅसिलस प्लांटारम नावाचा प्रोबायोटिक बॅक्टेरिया आहे जो अकाली वृद्धत्वावर मात करू शकतो. एका नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार, शास्त्रज्ञांनी किण्विन दुग्धजन्य पदार्थांपासून पुढील पिढीतील प्रोबायोटिक जीवाणू ओळखले आहेत.

गुवाहाटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडी इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी (IASST) चे शास्त्रज्ञ निरोगी जीवन जगण्यासाठी बॅक्टेरियाचा शोध घेत आहेत. त्यांनी प्रोबायोटिक जिवाणू लॅक्टोबॅसिलस प्लांटारम JBC5 शोधून काढला आहे आणि त्याचा प्रयोगशाळेत बेडकावर प्रयोग केला आहे.

डॉ. मोजिबूर आर. खान यांच्या नेतृत्वाखाली, टीमने सिद्ध केले आहे की, लॅक्टोबॅसिलस प्लांटारम JBC5 मॉडेल जीवामध्ये अँटिऑक्सीडेटिव्ह असतात, जन्मजात प्रतिकारशक्ती आणि सेरोटोनिन-सिग्नलिंग मार्ग सुधारून दीर्घायुष्य मिळते. या दह्यातील जीवाणूंनी सी. एलिगन्सचे सरासरी आयुष्य उपचार न केलेल्यांचा तुलनेत 27.81 टक्क्यांनी वाढवू शकते.

टीमने आता बॅक्टेरियाचा वापर करून विकसित केलेल्या दह्याच्या पेटंटसाठी अर्ज दाखल केला आहे आणि आशा आहे की प्रोबायोटिकचे लवकरच व्यावसायिकीकरण केले जाईल जेणेकरून प्रयोगशाळेद्वारे तयार केलेले तंत्रज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचवता येईल.