
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
बिग बी अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, ऋषि कपूर आणि प्राण यासारख्या कलाकारांच्या भूमिकेमुळे गाजलेला ‘अमर अकबर एंथनी’ हा चित्रपट 1977 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने त्या वेळी बॉक्स ऑफिसवर तुफान गल्ला जमावला होता. त्या काळात या चित्रपटाने तब्बल 7 कोटी 25 लाखांची दणदणीत कमाई केली होती. याची आठवण येण्याचे कारण जर हा चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झाला असता तर त्याने कमाईच्या बाबतीत त्याने ‘बाहुबली-2’ या सुपरहिट चित्रपटालाही पछाडले असते.
अभिताभ बच्चन यांच्या चाहत्याने ‘अमर अकबर एंथनी’ या चित्रपटाच्या कमाईबाबत एक खास ट्वीट केले आहे. या चाहत्याच्या ट्वीटनुसार, ‘अमर अकबर एंथनी’ चित्रपटाची कमाईॉ ‘बाहुबली-2’ पेक्षाही जास्त झाली असते. तिकीट दर आणि महागाईच्या हिशोबाने पाहिले तर हे शक्य आहे, असे त्याचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे या माहितीने बिग बींनी देखील आश्चर्यचकित झाले आहेत.
‘Amar Akbar Anthony’ is estimated to have made Rs 7.25 crore in those days. Inflation-adjusted, it crosses the collections of Bahubali 2—The Conclusion today! @SrBachchan pic.twitter.com/sOlkwvru6q
— Moses Sapir (@MosesSapir) May 28, 2019
‘अमर अकबर एंथनी’ चित्रपटाने त्या काळी 7 कोटींची कमाई केली होती. त्यावेळी तिकिटाचा दर होता फक्त 2 रुपये. चित्रपटाच्या कमाईच्या हिशोबाने पाहिले तर हा चित्रपट तब्बल 3 कोटी 62 लाख 50 हजार लोकांनी पाहिल. हिच संख्या 2017 मध्ये असलेल्या तिकिट दराच्या हिशोबाने पाहिली असता 159 रुपये तिकिट मुल्याप्रमाणे या चित्रपटाची कमाई 543 कोटी रुपये होते आहे. याचाच अर्थ या चित्रपटाने ‘बाहुबली-2’ चित्रपटाही मागे सोडले असते.
T 3178 –
चेहरे कुछ रंगों से विपरीत ; चेहरे कुछ मन के ना मीत ,
दिखा तो दो हमें उनका वो रूप ; अचल चंचल स्वरूप
समझ जाएँगे हम उनके मन का विचार ; संगठित उनका व्यवहार
वस्त्र ओढ़ लेने से न छुपा पाओगे तुम उन्हें यहाँ
पारदर्शी हैं हम , भार उनका आकार उनका, सिमिट जाएँगे यहाँ ! pic.twitter.com/5aLVacwRwo— Amitabh Bachchan (@SrBachchan) May 28, 2019
























































