खार रोड-विलेपार्ले विभागात हार्बर मार्गावर गाड्यांचा वेग वाढणार; पश्चिम रेल्वेकडून पायाभूत सुविधांचे काम पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील लोकल सेवांची गतिशीलता सुधारत सुरक्षितता आणि वेग वाढवण्याचे रल्वे प्रशासनानचे उद्दिष्ट आहे. पश्चिम रेल्वेने खार रोड-सांताक्रूझ-विलेपार्ले विभागातील हार्बर लाईनवर मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची कामे यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत. त्यामुळे या विभागातील कायमस्वरूपी वेग प्रतिबंध शिथिल करून 80 किमी प्रतितास झाला आहे. त्यामुळे या मार्गावर गाड्यांचा वेग वाढणार आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी प्रसिद्धीपत्रकात ही माहिती दिली आहे. या मार्गावरील मोठे पायाभूत काम यशस्वीरित्या पूर्ण केल्यामुळे, पश्चिम रेल्वे आता हार्बर मार्गावरील वेगात लक्षणीय सुधारणा करू शकेल. याआधी हार्बरच्या अप आणि डाऊन मार्गावर अनेक वक्र मार्ग होते. हे वक्र एक अंतर निर्माण करून आणि नंतर टीटीएम वापरून ट्रॅकच्या मॅन्युअल स्लीव्हिंगद्वारे स्थापित केले गेले. आवश्यक गती क्षमता प्राप्त करण्यासाठी प्लॅटफॉर्म कॉपिंग देखील कापले गेले आहे. कायमस्वरूपी वेग निर्बंधातून सूट देऊन आता विभागीय वेग 80 किमी प्रतितास इतका वाढला आहे. यामुळे सेक्शनवरील ट्रेन सुरळीत चालतील आणि गाड्यांचा वेगही वाढेल, असे त्यांनी म्हटले आहे.