
वार्षिक महाराष्ट्र तांदूळ महोत्सवाचे पहिले पर्व ग्रोवर्स डायरेक्ट, यशवंतराव चव्हाण केंद्र आणि श्री स्वामी समर्थ फार्मर्स मार्केट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले आहे. हा तांदूळ महोत्सव यशवंतराव चव्हाण केंद्र, नरीमन पॉइंट येथे 19 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत भरणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ग्राहकांना सर्वोत्तम दर्जाच्या भाताच्या 40 व्हरायटी पाहण्याची व खरेदी करण्याची संधी मिळत आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टीने हा उपक्रम एक अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. ‘ग्रोवर्स डायरेक्ट’चे संचालक नरेंद्र पवार यांनी हा महोत्सव सुरू केला आहे.



























































