यवतमाळ : महागावमधील घोनसरा शेत शिवारात गांजाची लागवड., 12 क्विंटल ओला गांजा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेतातील कापूस तूर पिकांमध्ये आंतरपीक म्हणुन गांजाची लागवड केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील घोनसरा – बार्गेवाडी शिवारात कारवाई करीत लाखो रुपयांची बाजार किंमत असलेला 12 क्विंटल गांजा जप्त करून चार आरोपींना अटक केली आहे.

पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या महागाव तालुक्यातील माळपठार भागात असलेल्या घोनसरा बार्गेवाडी शेत शिवारात 20 एकर शेतात कापुस, तूर पिकाबरोबर आंतरपीक म्हणून प्रतिबंधित असलेल्या गांजाची लागवड केली असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली त्यावरून पोलिसांनी मध्यरात्री माहिती मिळालेल्या शेतात जावुन पाहणी केली असता त्यांना त्या ठिकाणी गांजाची शेती दिसुन आली त्यानुसार त्यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली पोलिसांनी वीस एकर शेतात असलेले पिक उपटून गोळा केले असुन त्याचे त्याचे वजन अंदाजे १२ क्विंटल असुन याची बाजार भावानुसार लाखो रुपयांची किंमत असल्याची माहिती मिळाली. या भागात अशी अनेक शेतात गांजा लागवड असण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते .

पोलिसांनी सदर शेतातून 12 क्विंटल गांजा जप्त करून गांजाची लागवड करणाऱ्या देविदास ढाकरे, वनदेव ढाकरे,सुखदेव ढाकरे रा.घोनसरा फालासिंग राठोड रा. मोहदी ता.महागाव जि.यवतमाळ यांना अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ पवन बनसोड यांनी घटनस्थळाला भेट देवुन कारवाई संदर्भात पोलिस कर्मचाऱ्यांना निर्देश दिले आहेत.हे शेत मुख्य मार्गापासून अत्यंत दुर्गम भागात आहे .याचाच फायदा आरोपींनी उचलला . या शेतावर जाण्यासाठी चार चाकी वाहन नेता येत नसल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ पवन बनसोड यांनी दुचाकीवरून हे शेत गाठले .

सरकारच्या अनास्थेमुळे गांजा शेतीची वेळ; राज्य सरकार जबाबदारअसल्याचा आरोप.

शेतकरी संकटात असताना त्यांना मदत केली जात नाही. नऊ महिन्यात दोनशे शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. परंतु अजूनही त्यांना मदत मिळाली नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याने गांजा शेती करण्याची वेळ आल्याचा आरोप करण्यात येत आहे. शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, सरकारचे धोरणही चुकीचे आहे, त्यामुळे एकीकडे शेतकरी आत्महत्या वाढल्या आहे तर दुसरीकडे शेतकरी नाईलाजाने गांजा लागवडीकडे वळले आहे, त्यामुळे सरकारवरच गुन्हे दाखल करावे आणि कृषिमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शेतकरी स्वाभिमान पक्षाने केली आहे.

दरम्यान गांजा लागवड अजून कुठे कुठे करण्यात याचा तपास पोलीस कसोशीने करीत आहे .जिल्ह्यात एव्हडी मोठी कारवाई करण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असावी .

महागाव तालुक्यातील घोनसरा येथील शेतकऱ्यांनी बार्गेवाडी शेत शिवारात गांजाची लागवड केली असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्याची शहानिशा केल्यानंतर या ठिकाणावरून अंदाजे १०ते१२क्विंटल ओला गांजा जप्त करण्यात आला असुन त्याची किंमत 20 ते 25 लाख रुपये असु शकते याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या शिवारात अजुन काही ठिकाणी अशी शेती केल्या जात आहे का? याची माहिती घेणे चालु आहे. – – डॉ.पवन बनसोड (जिल्हा पोलिस अधीक्षक यवतमाळ)