
हिंदुस्थान आणि अफगाणिस्तान संघातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी-20 सामना गुरुवारी मोहालीत रंगला. या लढतीत यजमान संघाने पाहुण्यांचा 6 विकेट्सने पराभव करत मालिकेत आघाडी घेतली. शिवम दुबेने नाबाद अर्धशतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
या लढतीत हिंदुस्थानचा कॅप्टन रोहित शर्मा शुभमन गिलवर चांगलाच भडकला होता. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अफगाणिस्तानविरुद्ध गिल आणि रोहित सलामीला आले. रोहित जवळपास 14 महिन्यानंतर टी-20 सामना खेळत होता. दुसऱ्या चेंडूवर त्याने एक फटका मारला आणि धाव घेण्यासाठी पळाला. मात्र नॉन स्ट्राईकिंग एंडवर उभा शुभमन चेंडूकडेच बघत राहिला आणि त्यामुळे रोहित धावबाद झाला. यानंतर रोहित गिलवर भडकला. त्याचा रागाने लालबुंद झालेला चेहरा आणि शुभमनवर केलेला शाब्दिक हल्ला कॅमेऱ्यात कैद झाला.
सामना संपल्यानंतर याबाबत रोहितला प्रश्नही विचारण्यात आला. यावर उत्तर देताना रोहित म्हणाला की, सामन्यात अशा गोष्टी घडत असतात. जेव्हा असे काहीतरी होते तेव्हा तुम्ही निराश होता आणि रागही येतो. खेळपट्टीवर उभे राहून तुम्हाला संघासाठी धावा काढायच्या असतात. अर्थात नेहमी आपल्याला हवे तसे होत नाही. पण आम्ही सामना जिंकलो हे जास्त महत्त्वाचे आहे. गिलने पुढे अजून चांगला खेळ करावा, पण दुर्दैवाने तो छोटी पण चांगली खेळी करून बाद झाला.
View this post on Instagram
























































