कोरोनाशी लढण्यासाठी ‘यूजीसी’ची देशातील कॉलेज विद्यार्थ्यांना हाक;  ‘यंग कोविड-19 वॉरिअर्स’ मोहीम सुरू

देशासमोर सध्या सर्वात मोठे संकट कोणते असेल तर ते कोरोनाचे. औषधोपचारांबरोबरच मानसिक बळ आणि जनजागृती अशा उपाययोजनाच कोरोनावर मात करू शकतात. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) त्यासाठी देशातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हाक दिली आहे. यूजीसीने ‘यंग कोविड-19 वॉरिअर्स’ मोहीम सुरू केली आहे. त्यात सहभागी विद्यार्थ्यांना ठरावीक लक्ष्य दिले जाणार आहे. ते पूर्ण करणाऱया विद्यार्थ्यांना ‘युनिसेफ’कडून प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

‘यूजीसी’च्या या मोहिमेत 18 ते 30 वयोगटातील विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी होऊ शकणार आहेत. या मोहिमेत सहभागी विद्यार्थी आणि शिक्षकांना कोरोनाबाबत समाजात जनजागृती करावी लागणार आहे. त्यासाठी पुढील पाच प्रकारचे टास्क देण्यात आले आहेत ते पूर्ण करावे लागणार आहेत.

कोविड-19 यंग वॉरिअर्स मोहिमेत सहभागी होण्यासाठी काय कराल?

या मोहिमेत सहभागी होण्यासाठी ‘YWA’ असा मेसेज टाइप करून 9650414141 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावा पिंवा टेलिग्रामवर ‘युरिपोर्टइंडिया’ असे सर्च करून ‘YWA’ हा मेसेज पाठवावा.

आपली प्रतिक्रिया द्या