
सुरत येथून मुंबईत हिरे काम शिकण्यासाठी आलेल्या तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना वांद्रे परिसरात घडली. खुशाल गोधामी असे मृताचे नाव आहे. घटनास्थळी खेरवाडी पोलिसांना एक सुसाईड नोट आढळून आली आहे. नैराश्यातून आत्महत्या करत असल्याचे त्या सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे.
खुशाल वांद्रे पूर्वच्या ज्ञानेश्वर नगर येथील एका इमारतीमध्ये सहकाऱयासोबत राहत होता. गुरुवारी सकाळी खुशालचा मामेभाऊ हा कामावर आला. त्याने खुशालबाबत चौकशी केली. तेव्हा खुशाल कामावर आला नसल्याचे त्याला सांगण्यात आले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याच्या मामेभाऊ इमारतीमध्ये गेला. खुशालने दरवाजा आतून बंद करून ठेवला होता. त्याच्या भावाने याची माहिती खेरवाडी पोलिसांना दिली. दरवाजा तोडून पोलीस आत शिरले. तेव्हा खुशालने इस्त्र्ााrच्या वायरने गळफास लावला होता.

























































