
सामना प्रतिनिधी । कोपरगाव
कोपरगाव शहरातील गांधीनगर भागात राहणाऱ्या भिकन सिताराम डांगे याने मंगळवारी दुपारी आपल्या गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
भिकन डांगे हा तरुण कोपगरगावात आपल्या कुटुंबासह राहत होता. दुपारी घरी कोणी नसताना त्याने ओढणीच्या साहाय्याने पंख्याला लटकून आत्महत्या केली. भिकनचा चुलत भाऊ नंदू डांगे यांने तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व अकस्मिक मृत्यूची नोंद केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठलवला. त्यानंतर मृतदेह कुटुबीयांच्या स्वाधीन केला. संध्याकाळी उशिरा मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भिकनच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.





























































