केकवर गोळ्या झाडणे पडले महागात, पोलीस तरुणांच्या शोधात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बागपत

वाढदिवशी केक कापणे हे आलेच. काही जण तो सुरीने कापतात काही महाशय तलवारीने केक कापतात. परंतु उत्तर प्रदेशमध्ये काही तरुणांनी चक्क केकवर गोळ्या झाडल्या आहेत. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

एका तरुणाचा वाढदिवस होता, तेव्हा त्याच्या मित्रांनी केक आणला होता. तेव्हा या तरुणाने केक सुरीने कापण्या ऐवजी गोळ्या झाडून केक कापला. याचा व्हिडीओही त्यांनी शूट केला. ट्विटरवर एका युजरने हा व्हिडीओ पोस्ट करून पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. तेव्हा पोलिसांनी याची तत्काळ दखल घेत गुन्हा नोंदवला आहे. सदर घटना बागपत जिल्ह्यातील सरुरपूर खेकरी गावातील आहे अशी प्राथमिक माहिती मिळाली असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.