
मित्राला मारहाण करतात, त्यामुळे त्याच्या मदतीला धावत जाऊन भांडण सोडविण्याचा प्रयत्न करणाऱया तरुणाची चाकूने भोसकून हत्या झाल्याची घटना चेंबूर येथे घडली.
मात्र चेंबूर पोलिसांनी तत्काळ तपास हाती घेऊन चौघा आरोपींना 24 तासांच्या आत गजाआड केले. आदित्य देसाई, त्याचा भाऊ अक्षय देसाई त्यांचा मित्र विकी शेजुळ हे चेंबूर कॅम्प येथून चालत जात असताना त्यांचा मित्र गणेश लोकरे याला अमर सिंग, अजय धर्मास्वामी, रमण शेट्टी व विशाल जाधव हे चौघे मारहाण करीत होते.
त्यामुळे अक्षय,आदित्य आणि विकी गणेशच्या मदतीला धावले. तर आरोपींनी या तिघांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी अमर सिंग या आरोपीने त्याच्याकडील चाकू अक्षयच्या छातीच्या डाव्या बाजूला भोसकला. त्यातच अक्षयचा मृत्यू झाला.
याप्रकरणी आदित्यने तक्रार देताच चेंबूर पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून अमरसह अन्य तिघा आरोपींना 24 तासांच्या आत गजाआड केले.
























































