ओळख न दिल्यामुळे तरुणाला धारदार शस्त्राने मारहाण

ओळख न दिल्याचा राग मनात धरून आरोपीने साथीदारांसोबत येऊन तरुणाला लोखंडी शस्त्राने मारहाण केल्याची घटना कोंढवा खुर्द परिसरात घडली. त्यानंतर टोळक्याने परिसरातील एका कार्यालयाचे शटर आणि दुचाकीची तोडफोड केली. याप्रकरणी कोँढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत आसीफ शेख (35रा. कोंढवा खुर्द) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 16 एप्रिलला रात्री साडेआठच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हे कोंढवा खुर्द परिसरात मित्रांसोबत बसले होते. त्यावेळी आरोपी फैजल याला शेख यांनी ओळख दिली नाही. याचा राग त्याला आला. त्याने साथीदारांना बोलवून लोखंडी शस्त्राने दहशत निर्माण करून आसिफला हत्याराने मारहाण केली. तसेच परिसरातील कार्यालयाचे शटर आणि दुचाकीची तोडफोड केली. याप्रकरणी कोंढवा पोलीस तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या