
आज मोबाईलच्या कचाटय़ात अडकलेल्या शालेय आणि युवा पिढीचे पाय मैदानाला लागावेत आणि विविध खेळांच्या माध्यमातून घाम गाळावा म्हणून युवासेनेच्या माध्यमातून शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून 4 आणि 11 डिसेंबरला सकाळी 7 ते 11 दरम्यान गोरेगाव पूर्वेला रहेजा गार्डनच्या रस्त्यावर स्विट ऑन स्ट्रीट या आगळय़ावेगळय़ा रस्त्यावरचे फिटनेस फेस्टिव्हलचे आयोजन केले जाणार आहे. युवासेनेच्या कोअर कमिटीचे सदस्य अंकित प्रभू यांनी या फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे.
उद्या आणि पुढच्या रविवारी होणाऱ्या या अभूतपूर्व फिटनेस सोहळय़ात शालेय आणि युवा पिढीला आकर्षित करण्यासाठी रहेजा गार्डनच्या रस्त्यावर झुंबा, क्रॉस फिट, योग, नृत्य, जिम्नॅस्टिक, बालकांसाठी धम्माल विभाग आणि तायक्वाँदो अशा विविध खेळांचे आयोजन केले जाणार आहे. फिटनेसची आवड निर्माण करणाऱ्या सोहळय़ात विभागातील हजारो मुले आणि युवा सहभागी होऊन धम्माल करीत फिटनेसचा आनंद घेणार असल्याची माहिती अंकित प्रभू यांनी दिली.































































