शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेना कॉलेज कक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. सचिवपदी प्रिन्स चाको यांची तर सक्रीय सदस्यपदी गौरव मोरे (उत्तर-मध्य मुंबई लोकसभा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.



























































