
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेनेच्या कार्यकारिणी सदस्यांची नियुक्ती जाहीर केली आहे.
जय सरपोतदार, अभिषेक शिर्के, योगेश निमसे, दीपक दातीर, सिद्धेश शिंदे, रायन मेनेझेस, अश्विनी पवार, अॅड. गुरशीन साहनी, रुची राऊत, प्रियंका जोशी, दीक्षा संखे-कारकर, धनश्री विचारे यांची युवासेनेच्या कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातर्फे प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
युवासेना उपसचिव, सहसचिव जाहीर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेना उपसचिवपदी नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. उपसचिवपदी हेमंत दुधवडकर, रणजित कदम, प्रथमेश सकपाळ, गीता कदम यांची तर सहसचिवपदी रोशनी शिंदे नियुक्ती केली आहे, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.


























































