
केरळच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘झ्विगाटो’चा प्रीमियर होणार आहे. महोत्सवाच्या कलिडोस्कोप विभागात त्याचे प्रदर्शन 10 आणि 13 डिसेंबर रोजी होणार आहे.नंदिता दास लिखित आणि दिग्दर्शित ‘झ्विगाटो’ चित्रपटात कपिल शर्मा डिलिव्हरी फूड रायडरच्या भूमिकेत दिसणार आहे, तर त्याच्या पत्नीच्या भूमिकेत अभिनेत्री शहाना गोस्वामी आहे. भुवनेश्वरच्या पार्श्वभूमीवरचा हा चित्रपट साथीच्या आजारानंतर एका सामान्य कुटुंबाच्या अथक संघर्षाची कथा सांगतो. जीवन कडू किंवा गोड असू शकते. ते जगायला शिका, असा संदेश देणारा हा चित्रपट आहे. 27वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 9 ते 16 डिसेंबर दरम्यान त्रिवेंद्रम येथे आयोजित करण्यात आला आहे.