चंद्रपूर – विवाहबाह्य संबंधातून प्रेयसीचा खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

गत 10 वर्षाहून अधिक काळ सुरू असलेल्या प्रेम प्रकरणाचा अंत प्रेयसीच्या खुनाने झाला. ही घटना चंद्रपूर शहरातील जुनोना चौक परिसरात उजेडात आली आहे. दुर्गा उमरे असे मृत महिलेचे नाव आहे. या हत्या प्रकरणातील आरोपी राकेश ढोले स्वतः विवाहित आहे. मात्र त्याचे विवाहाच्या आधीपासून दुर्गा उमरे हिच्याशी प्रेमसंबंध होते.

लग्नानंतर दीर्घकाळपर्यंत दोघांमध्ये वाद-विवाद होत होते. आज सकाळी दुर्गा उमरे हिने आरोपीला स्वतःच्या घरी बोलावले. तेव्हादेखील या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणादरम्यान आरोपी राकेश ढोले याने घरातच असलेल्या एका लाकडी दांडक्याने दुर्गा उमरे हिच्या डोक्यावर वार करत तिला जखमी केले. दुर्गा घरातच गतप्राण झाली. यानंतर आरोपी घटनास्थळावरून निघून गेला. परिसरातील नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपी राकेश ढोले यास तातडीने ताब्यात घेत गुन्हा नोंद केला. प्रकरणाचा तपास रामनगर पोलिस करत आहेत.