
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू कश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात एका दहा वर्षीय मुलाची अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आली आहे. उमर फारुख असे त्या मुलाचे नाव असून त्याचा मृतदेह नग्न अवस्थेत अर्धा जळालेला आढळला आहे. उमरचा एक हात देखील धडापासून वेगळा करण्यात आलाय उमरचा मृतदेह आढळल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये संताप पसरला असून लवकरात लवकर उमरच्या मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. याप्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी एका विशेष पथकाची स्थापना केली आहे.
उमर फारुक हा सोमवारी काही सामान आणण्यासाठी गुलगाम गावातील बाजारात गेला होता. मात्र बराच वेळ घरी न परतल्याने त्याच्या पालकांनी शोधशोध करण्यास सुरुवात केली. मात्र उमरचा काहीच पत्ता लागला नाही. अखेर याप्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली. गुरुवारी संध्याकाळी काही स्थानिक नागरिकांना उमरचा मृतदेह झुडुपात आढळून आला. उमरच्या संपूर्ण शरीरावर मारहाणीचे व्रण असून त्याचा एक हात देखील धडापासून वेगळा करण्यात आलाय. उमरचा मृतदेग नग्न अवस्थेत अर्धा जळालेला आढळून आलाय. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहेत.






























































