
शनि ग्रहावर एक महाकाय तूफान आले आहे. या तूफानाने संपूर्ण शनी ग्रहाभोवती वलय तयार केले आहे. हे तुफान एवढे मोठे आहे की त्याला पार करायला किमान 100 वर्षे तरी लागतील असे म्हटले जात आहे. शनि ग्रहावर यापूर्वीही अनेक भयानक वादळे आली आहेत. शनि ग्रहावर वादळ येणे ही सामान्य गोष्ट मानली जाते. परंतू आता आलेल्या या वादळातून रेडिओ सिग्नल मिळत आहेत. वादळाचे रेडिओ सिग्नल मिळणे ही दुर्मिळ घटना असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
शनि ग्रहावरील वादळांना ग्रेट व्हाईट स्पॉट्स म्हणतात. ते ग्रहाच्या उत्तर गोलार्धात दर 20 किंवा 30 वर्षांनी एकदा तयार होतात. ही वादळे अनेक महिने सुरूच असतात. 1876 पासून आत्तापर्यंत खगोलशास्त्रज्ञांनी शनि ग्रहावर सहा महाकाय वादळे पाहिली आहेत. शेवटेचे वादळ 2010 मध्ये दिसले होते. नासाच्या कॅसिनी यानाने त्या वादळाचे छायाचित्र टिपले होते. हे वादळ सुमारे 200 दिवस सुरू होते. 200 दिवस सुरू असलेले हे वादळ प्रचंड असल्याचे अभ्यासांती समजले.
रेडिओ टेलिस्कोप मुळे सध्या सुरू असलेल्या वादळाची माहिती मिळाली आहे. खगोलतज्ञांच्या मते किमान पुढील 100 वर्षे हे वादळ शनि ग्रहाच्या वातावरणात दिसेल. आता सुरू असलेले वादळ इतके भयानक आहे की ते रेडिओ सिग्नल तयार करत आहे. पण अशा लहरी येण्यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. हे वादळ जरी थांबले तरी त्याचा प्रभाव अनेक शतके टिकू शकतो. या वादळामुळे वातावरणात रासायनिक बदल होताना दिसत आहेत.
शनि ग्रहावर मेगास्ट्रोम्स नियमितपणे दिसतात. अदृश्य होण्यापूर्वी तुलनेने सौम्य पृष्ठभागावर परिणाम करतात. न्यू मेक्सिकोमध्ये असलेल्या व्हेरी लार्ज अॅरे रेडिओ टेलिस्कोपने शनि ग्रहाचा अभ्यास केला असता, ग्रहावर सहा विशाल वादळांचे अवशेष सापडले. पहिले वादळ सुमारे 130 वर्षांपूर्वी आले होते मात्र त्याचा प्रभाव अद्यापही शनि ग्रहाच्या वातावरणात पाहावयास मिळतो.