
सामना ऑनलाईन । तिरुचिरापल्ली
दिल्लीत धडक मारत गेल्या वर्षी तब्बल 100 दिवस अखंड आंदोलन केलेल्या तामीळनाडूच्या 111 शेतकरी आंदोलकांनी वाराणसीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढवायचे ठरवले आहे. त्यासाठी 300 शेतकऱयांनी रेल्वेची तिकिटेही आरक्षित केली आहेत, अशी माहिती त्या शेतकऱयांचे नेते पी. अय्याकन्नू यांनी दिली. ते नॅशनल साऊथ इंडियन रिव्हर्स इंटरलिंकिंग फार्मर्स असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. शेतमालाला फायदेशीर भाव देण्याबरोबरच शेतकऱयांच्या इतर न्याय्य मागण्या मान्य करण्याचे आश्वासन भाजपच्या जाहीरनाम्यातून देण्यात आले पाहिजे. त्यासाठीच 111 शेतकऱयांनी वाराणसीतून मोदींच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे पाऊल उचलले आहे, असे अय्याकन्नू यांनी सांगितले.






















































