बीडमध्ये आढळले कोरोनाचे 146 रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 9 हजाराच्या वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या 24 तासात बीड जिल्ह्यात कोरोनाचे 146 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 9704 वर पोहचली आहे.

मंगळवारी दुपारी 892 जणांचा अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये 146 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. तर 746 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. 146 जणांमध्ये अंबाजोगाई तालुक्यातील 27 जण, आष्टी तालुक्यातील 21 जण, बीड तालुक्यातील 38 जण, धारूर 8, गेवराई 6, केज 19, माजलगाव 6, परळी 7, पाटोदा 5, शिरूर 6 आणि वडवणी तालुक्यातील 3 जणांचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात  आतापर्यंत 6778 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर 2767 जणांवर उपचार सुरू आहेत. बीड जिल्ह्यातील  ग्रामिण भागामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.