
कर्नाटकच्या रंगनाथपुरामध्ये एका कबरीतून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत असल्याने सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. गावकऱ्यांनी काही प्राणीमित्रांना घटनेची माहिती दिली. त्यावेळी कबरीची पाहणी केली असता, त्यात 15 फूट खेल खड्ड्यात सुमारे 150 कुत्र्यांना पुरण्यात आल्याचे दिसून आले. त्यातील काही कुत्रे जिंवत होते आणि जीव वाचवण्यासाठी ते भुंकत होते. पोलिसांनी घटनेची दखल घेतली असून तपासाला सुरुवात केली आहे.
गावकऱ्यांनी प्राणीमित्रांना घटनेची माहिती दिल्यावर शिवमोग्गा अॅनिमल रेक्यूचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. कबरीतून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत असल्याचे गावकऱ्यांनी सदस्यांना सांगितले. त्यांनी तातडीने कबरीची पाहणी केली. त्यावेळी कबरीत 15 फूट खोल खड्ड्यात 150 पेक्षा जास्त कुत्र्यांना पुरण्यात आल्याचे दिसून आले. त्यातील काही जिंवत असून ते जिवाच्या आंकाताने भुंकत होते.
प्राणीमित्रांनी जिवंत असलेल्या कुत्र्यांना बाहेर काढले आणि इतर कुत्र्यांच्या मृतदेहाची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली. जिवंत असलेल्या कुत्र्यांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली. या कुत्र्यांना जमिनीत पुरण्यापूर्वी त्यांना विष देण्यात आल्याचे तपासणीत दिसून आले. त्यानंतरही काही कुत्रे जिंवत होते आणि ते भुंकत होते.
या घटनेची योग्य ती माहिती घेत पोलिसांना अहवाल सादर करणार असल्याचे शिवमोग्गा अॅनिमल रेक्यूचे सदस्य लक्ष्मी प्रसाद यांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी ग्राम पंचायतीच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कुत्र्यांना पकडण्याचे किंवा त्यांना मारण्याचे कोणेतही आदेश ग्रामपंचायतीने दिले नव्हते, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पोलिसांना तपासात सहकार्य करणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
हसन गावात 37 माकडांना मारण्यात आल्याची घटना ताजी असतानाच ही घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. माकडांना मारण्यात आल्याप्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. माकडांना स्थलांतरीत करण्याचे काम काही अधिकाऱ्यांना देण्यात आले होते.
माकडांना मारण्याचा कोणताही उद्देश नसल्याचे सांगण्यात आले. गावात माकडांचा त्रास वाढल्याने माकडांना स्थलांतरीत करण्यात येत होते. आता भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून वाचण्यासाठी हे कृत्य केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्राणीमित्रांनी या घटनेचा निषेध केला असून दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.


























































