गांजा विक्रीच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक, 23 किलो गांजा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाविद्यालयीन तरूणांना गांजा विक्रीच्या तयारीत असलेल्या तिघांना अमली पदार्थ विरोधी पथक एकने अटक केली. त्यांच्याकडून साडेचार लाख रुपये किंमतीचा 23 किलो गांजा, दोन कोयते, मोबाईल, रोकड व इलेक्ट्रीक वजन काटा जप्त केला. ही कारवाई भारती विद्यापीठ आणि सिंहगड रोड परिसरात करण्यात आली.

अमित उर्फ बॉब प्रभाकर कुमावत (वय 32,रा. समर्थनगर हिंगणे), सनी विजय भोसले (वय 24), साई गिता कोताकोंडा (वय 19,रा.दोघे रा.जाधवनगर वडगाव बुद्रुक ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

अमली पदार्थ विरोधी पथक हद्दीत गस्त घालत असताना घरातून एकजण गांजाची विक्री करीत असल्याची माहिती पोलीस अमलदार विशाल शिंदे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून अमित उर्फ बॉब याला ताब्यात घेतले. त्याच्या घरातून 4 लाख 23 हजार रुपये किंमतीचा 21 किलो गांजा जप्त केला. त्याशिवाय सिंहगड रोड जाधवनगर परिसरात सनी व साई यांना ताब्यात घेऊन 31 हजार रुपयांचा दीड किलो गांजा, दोन मोबाईल व रोकड, कोयते जप्त केले. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, मारूती पारधी, मनोजकुमार साळुंखे, पांडुरंग पवार, विशाल दळवी, राहूल जोशी, संदीप जाधव, प्रवीण उत्तेकर, विशाल शिंदे, संदेश काकडे, नितेश जाधव, योगेश मोहिते रेहाना शेख यांनी केली.

महाविद्यालयीन तरूणांना गांजा विक्रीचा प्रयत्न

आरोपी मुळचे नगर जिल्ह्यातील असून एकमेकांच्या ओळखीतील आहेत. ते कात्रज, सिंहगड रोड परिसातील नामांकित महाविद्यालय परिसरात विद्याथ्र्यांना गांजाची विक्री करीत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांनी विक्रीसाठी गांजा कोठून आणला आहे, गांजा तस्करीमध्ये कोणाकोणाचा समावेश आहे, याची माहिती घेण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली.