चिकन टिक्का पिझ्झा खाल्याने 23 वर्षीय युवकाचा मृत्यू… वाचा काय आहे प्रकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच चवीने पिझ्झा खाणे पसंत करताता. पण पिझ्झा खाल्ल्यामुळे मृत्यू होऊ शकतो असा कोणी विचारही करु शकणार नाही. पण इंग्लडमध्ये एक दुर्दैवी घटना घडली असून पिझ्झा खाल्यामुळे एका युवकाचा मृत्यू झाला आहे.

एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनूसार, 23 वर्षीय जेम्स स्टुअर्ट एटकिंसन याला शेंगदाण्याची एलर्जी होती. त्यामुळे कोणताही पदार्थ खाताना पदार्थामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश केला आहे. याची चौकशी केल्यानंतरच तो पदार्थ खात असे. एक दिवस जेम्सच्या मित्राने न्यूकॅसलमधील दाद्याल रेस्टॉरंटमधून चिकन टिक्का पिझ्झा ऑर्डर केला होता. मात्र यावेळेस पिझ्झा मागवताना जेम्सने कोणतीही चौकशी केली नाही. त्या पिझ्झामध्ये शेंगदाण्यांचा समावेश करण्यात आल्याची कल्पना जेम्सला नव्हती.जेम्सने पिझ्झाचा फक्त अर्धा तुकडा खाल्ला आणि तो खाताच त्याला अशक्तपणा जाणवायला लागला. त्याने स्वत:साठी रुग्णवाहिका बोलावली. रुग्णवाहिका येईपर्यंत तो बेशु्द्ध झाला होता. रुग्णालयात नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

जेम्सच्या मृत्यूची केस न्यायालयात गेली असून या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. पॅथॉलॉजिस्ट जेनिफल बोल्टन यांनी सुणावनीवेळी सांगितले की, अन्नाची तपासणी केली असता त्यात शेंगदाणे आढळले आहेत. ते पुढे म्हणाले की, पिझ्झामध्ये शेंगदाण्याचे पुरेसे प्रमाण होते, त्यामुळेच जेम्सच्या शरीरावर त्याचा नकारात्मक परिणाम झाला. वैद्यकीय तपासणी केली असता जेम्सच्या पोटात शेंगदाण्याचे तुकडेही आढळले आहेत.