
सामना ऑनलाईन । रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर- नायरी एसटी बसला निवळी घाटात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील 22 प्रवासी जखमी झाले असून त्यांना संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी सुरेखा झोरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना पुढिल उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून बचावकार्य केले. धावती बस घाटात तिनवेळा पलटी मारून उलटली आहे असे सांगण्यात येते. अपघातानंतर आमदार सदानंद चव्हाण आणि एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक दिवटे यांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्य केले. या बसमध्ये शाळा आणि महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचीस संख्या जास्त होती.























































