Video – भरधाव एसटी बस नाल्यात कोसळली, 25 प्रवासी जखमी; थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

मध्य प्रदेशमध्ये गुरुवारी सायंकाळी 5 वाजता खासगी एसटी बसचा अपघात झाला. खरगोन जिल्ह्यातील रोडियाजवळ एक प्रवासी बस पुलावरून खाली पडली. टायर फुटल्याने 20 फूट उंच पुलावरून ही बस नदीत पडली, यात सुमारे 25 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ही बस (क्र एमपी 10 पी 8088) सनावदकडे जात होती. टायर फुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ती नाल्यात पडली. यात बस चालकाला गंभीर दुखापत झाली असून प्रवासी किरकोळ दुखापत झाली आहे.

दरम्यान, या बस अपघाताचा लाईव्ह व्हिडीओ समोर आला आहे. पाठीमागून येणाऱ्या चारचाकी वाहनाच्या डॅश कॅममध्ये हा संपूर्ण अपघात कैद झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

पोलिसांच्या पथकाने प्रवाशांची सुटका केली

या प्रकरणाची माहिती मिळताच रोडिया पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने सर्व प्रवाशांना बसमधून सुखरूप बाहेर काढण्यात आले. पोलिसांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.