अपमानाचा बदला घेण्यासाठी दोन महिन्यांच्या बाळाचा गळा घोटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । गुरुग्राम

सर्वांसमोर मित्राचा अपमान करणे एका हरयाणातील एका व्यक्तीला आयुष्यभराचं दु:ख देऊन गेले आहे. मित्राने सर्वांदेखत अपमान केला म्हणून एका व्यक्तीने त्या मित्राच्या दोन महिन्यांच्या बाळाची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मनजित राम असे त्या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

मनजित राम व त्या बाळाचे वडील किशोर हे एकमेकांचे चांगले मित्र होते. गुरुवारी रात्री हे दोघे व त्यांचे इतर काही मित्र जेवायला बाहेर गेले होते. त्यावेळी मस्करी मस्करीमध्ये किशोरने मनजितचा अपमान केला. सर्वांदेखत अपमान झाल्याने मनजित खवळला व ‘तुला याचा पश्चाताप होईल, रडशील तू’ अशी धमकी देऊन तिथून निघून गेला. त्यानंतर तो थेट मनजितच्या घरी गेला आणि तेथून त्याने बाळाचे अपहरण केले व स्वत:च्या घराजवळील एका निर्जन स्थळी नेऊन त्याने मुलाचा गळा घोटला. त्यानंतर त्याचा मृतदेह जमिनीत पुरला. किशोरला मुलाचे अपहरण झाल्याचे समजताच त्याने पोलिसांत तक्रार दिली व मनजितवर संशय असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मनजितला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली

SUMMARY : 28­-year­-old held for killing friend’s two­ month­ old infant in fit of rage in Gurugram