फेसबुकवरच्या जाहिरातबाजीवर 28 कोटी खर्च, राजकीय पक्षांमध्ये भाजप सर्वात पुढे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेसबुकवर करण्यात येत असलेल्या प्रचारासाठी राजकीय पक्षांकडून आतापर्यंत 8 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. यात भाजप आणि भाजपचे कार्यकर्ते सर्वात पुढे आहेत. फेसबुकच्या ऍड लायब्ररीने हा अहवाल दिला आहे.

फेसबुकवर राजकीय प्रचाराला फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. फेब्रुवारी ते 16 मार्चपर्यंत 34 हजार 48 जाहिरातीतून 6 कोटी तर 16 ते 23 मार्चपर्यंत जाहिरातींचा हा आकडा वाढून तो 41 हजार 514 झाला आणि फेसबुकने 8 कोटी 38 लाखांची कमाई केली. या जाहिराती प्रसिद्ध करताना पारदर्शकता ठेवण्यात आली असल्याचे फेसबुकने स्पष्ट केले आहे. ही राजकीय जाहिरातबाजी कोण करतेय, हे जाहिरातीखाली देण्यात येत आहे.

‘भारत के मन की बात’ या फेसबुक पेजने आतापर्यंत 3 हजार 700 जाहिराती प्रसिद्ध केल्या. दोन श्रेणीमध्ये प्रसिद्धीला दिलेल्या या जाहिरातींवर 2 कोटी 23 लाख खर्च केले. ‘माय फर्स्ट वोट फोर मोदी’ आणि ‘नेशन विथ नमो’ या दोन पानांवर 2 कोटी 12 लाख रुपये खर्च केले.
काँग्रेसने फेब्रुवारी ते 23 मार्चपर्यंत 410 जाहिराती प्रसिद्ध केल्या. त्यावर 5 कोटी 91 लाख रुपये खर्च केले.