जीएसटी वसुलीमध्ये 28 टक्क्यांची वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छोटय़ा छोटय़ा वस्तूंवरही वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी लावणाऱया केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यात या माध्यमातून चांगलाच महसूल कमावला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या ऑगस्टमध्ये केंद्राच्या तिजोरीत तब्बल 28 टक्के अधिक जीएसटीची भर पडली आहे. महिनाभरात जवळपास 1 लाख 44 हजार कोटींच्या घरात जीएसटी वसुली झाली आहे.

केंद्र सरकारने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट महिन्यात एकूण 1,43,612 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले. त्यात सीजीएसटीचे 24,710 कोटी, एसजीएसटीचे 30,951 कोटी, आयजीएसटीचे 77,782 कोटी आणि उपकरच्या 10,168 कोटी रुपयांचा समावेश आहे.