300 दहशतवादी हिंदुस्थानात घुसखोरीच्या तयारीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

नियंत्रण रेषेपलिकडे तब्बल 300 दहशतवादी हिंदुस्थानात घुसखोरीच्या तयारीत असल्याची खळबळजनक माहिती लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिली आहे. नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रावत यांनी जम्मू- कश्मीरमधील सध्यस्थिती व दहशतवाद यावरही भाष्य केले.

घुसखोरांना पाकिस्तानचे समर्थन असून दहशतवादाचा सामना करण्यासाठी लष्करही तयार आहे. असेही रावत यावेळी म्हणाले त्याचप्रमाणे आधीच्या तुलनेत आता जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादाच्या घटनांमध्ये घट झाली आहे. कश्मीर खोऱ्यातील अनेक तरुण दहशतवादाचा मार्ग सोडण्यास इच्छुक असून हिंदु्थानी लष्कर नेहमीच त्यांच्या मदतीसाठी तयार आहे. जम्मू-कश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे आम्ही समन्वयक आहोत. असेही रावत म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी नियंत्रण रेषेपलिकडे तब्बल 300 दहशतवादी हिंदुस्थानात घुसखोरीच्या तयारीत असून या दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी जवान तयार असल्याचे ते म्हणाले.

तसेच जम्मू-कश्मीरमधील अनेक भागात दहशतवाद्यांच्या प्रेतयात्रेवरील बंदीचा निर्णय योग्य होता. कारण त्यानंतरच कश्मीर खोऱ्यातील परिस्थिती सुधरली. असेही यावेळी त्यांनी सांगितले. उत्तर व पश्चिम सीमेवर परिस्थिती नियंत्रणात असून चिंतेचे कारण नसल्याचेही रावत म्हणाले.

कट्टरवादाने आपल्या देशात वेगळेच रुप धारण केले असून जम्मू-कश्मीरमधील तरूणही त्यामुळेच कट्टर होत आहेत.कारण त्यांना धर्माबद्दल चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल केली जात आहे. यासाठी सोशल मीडियाचाही वापर होत आहे. असेही रावत यांनी यावेळी म्हणाले.