
उत्तर रेल्वेच्या लखनौ विभागाला एक उंदीर मारण्यासाठी तब्बल 41 हजार रुपये खर्च आलाय. हा खर्च तोंडात बोटे घालायला लावणारा असून माहिती अधिकाराखाली ही बाब उघड झाली आहे. त्यामुळे हेच का मोदी सरकारचे ना खाऊंगा, ना खाने दुंगा असा सवाल आता जनता करू लागली आहे. तसेच यात भ्रष्टाचाराचा वास येत असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी सोशल मीडियावरून होत आहे.
2020 ते 2022 दरम्यान 168 उंदीर पकडण्यात आले. त्यासाठी वर्षाला तब्बल 23.2 लाख खर्च आला आणि एका उंदरामागे 41 हजार रुपये खर्च करण्यात आल्याचे लखनौ विभागाने म्हटले आहे. दरम्यान, एक उंदीर पकडण्यासाठी तब्बल साडेसहा दिवसांचा कालावधी लागल्याचे समोर आले आहे.


























































