
Oppo चा Oppo F19 हा स्मार्टफोन लवकरच लॉन्च होणार आहे. कंपनीने हा फोन Bluetooth SIG सर्टिफिकेशन साठी लिस्टिंग केला आहे. म्हणजेच लवकरच हा फोन बाजारात उपलब्ध होणार आहे. या फोनमध्ये 48 मेगापिक्सल कॅमेरा असून 128 GB स्टोरेज देण्यात आले आहे.
फोनमध्ये लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम 11 असणार आहे. तसेच स्क्रीन 6.4३ इंच फुल एचडी असणार आहे. फोनमध्ये क्वालाकॉम स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर तर 4 GB RAM आणि 128 GB इंटर्नल मेमरी असणार आहे. फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि फोनची क्षमता 5 हजार MAh इतकी असणार आहे. फोनची किंमत 18 हजार इतकी असेल असे सांगण्यात येत आहे.


























































