
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
देशातील प्रत्येक खेडेगावात वीज पोहोचली आहे असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमध्ये तीनच महिन्यांपूर्वी केला होता, पण केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयानेच त्यांचे ‘झूठ’ जगजाहीर केले आहे. आजही देशात सुमारे पाच हजार गावे विजेपासून वंचित असल्याने अंधारात आहेत, असा अहवाल त्या मंत्रालयाने दिला आहे.
विजेपासून वंचित सर्वाधिक म्हणजे १ हजार ४४ गावे उत्तर प्रदेशात.
बिहारमध्ये ५३३ आणि ओडिशात ६६६ गावांमध्ये विजेचा पत्ता नाही.
एक ते चार तास वीज मिळणारी गावे : ६ हजार ५८६
पाच ते आठ तास वीज मिळणारी गावे : १४ हजार ६७२
नऊ ते १२ तास वीज मिळणारी गावे : ३७ हजार १६८
पाच हजार नव्हे, १३ हजार गावे
देशात विजेपासून वंचित असलेल्या गावांची संख्या सुमारे पाच हजार आहे, असे केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाचा ताजा अहवाल सांगतो. पण सिम्बियोसीस इन्स्टिटय़ूट ऑफ रुरल स्टडीजचे तज्ञ पल्लभ भट्टाचार्य यांच्या मते विजेपासून वंचित गावांची संख्या १३ हजारांपर्यंत जाऊ शकते.






























































