पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षांचा निकाल जाहीर; 31 हजार 251 विद्यार्थ्यांनी मिळवली शिष्यवृत्ती

राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून पाचवीचे 16 हजार 537 तर आठवीचे 14 हजार 714 असे एकूण 31 हजार 251 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. परिषदेच्या वेबसाईटवर शाळांना निकाल पाहता येणार आहे.

दोन्ही परीक्षा मिळून राज्यातील एकूण 1 लाख 70 हजार 268 विद्यार्थी पात्र ठरले असून एकूण निकालाची टक्केवारी 19.56 आहे. शाळांना परिषदेच्या www.mscepune.in Je http://mscepuppss.in या वेबसाईटवर निकाल पाहता येईल. पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 5 लाख 14 हजार 131 विद्यार्थी बसले होते.