61वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धा गिरगाव केंद्रातून ‘नात्याची गोष्ट’ प्रथम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

61 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धेत गिरगाव केंद्रातून चारकोप कल्चरल ऍण्ड स्पोर्ट्स फाऊंडेशन, मुंबई या संस्थेच्या ‘नात्याची गोष्ट’ या नाटकाला प्रथम पारितोषिक मिळाले. बेस्ट कला व क्रीडा मंडळ, मुंबई या संस्थेच्या ‘ऱहासपर्व’ या नाटकास द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. तृतीय पारितोषिक सद्भावना, मुंबई या संस्थेच्या ‘माझं घर’ या नाटकाला मिळाले.

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 15 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या कालावधीत मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगाव येथे स्पर्धा पार पडली. स्पर्धेत 17 नाटय़प्रयोग सादर झाले. स्पर्धेसाठी श्रीपाद जोशी, किरण येवलेकर, मिलिंद दांडेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

दिग्दर्शन- नीलेश गोपनारायण (नाटक – नात्याची गोष्ट), गणेश मिंडे (नाटक – ऱहासपर्व)

प्रकाश योजना- कैलास ठाकूर (गणपती वप्प मोरयं), प्रशांत सावंत (ऱहासपर्व)

नेपथ्य- नंदकुमार सावंत (ऱहासपर्व), सुधीर ठाकूर (वर्तुळ)

रंगभूषा- सुनील ताम्हणकर (ऱहासपर्व).  उदयराज तांगडी (गणपती वप्प मोरया),

उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक- नीलेश गोपनारायण  (नात्याची गोष्ट) आणि प्रियांका जाधव ठोकळे
(माझं घर).