72 टक्के विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून अभ्यासाव्यतिरिक्त इतर मार्गदर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शैक्षणिक मार्गदर्शनाशिवाय विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षकांची मदत होत असल्याचे ब्रेनलीने केलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी शिक्षकांशी सक्रियपणे संपर्प साधण्याबरोबरच 72 टक्के विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांशी अभ्यासेतर मार्गदर्शनासाठीही संपर्क साधत आहेत.

गेल्या वर्षी केवळ 57 टक्के विद्यार्थ्यांनी शैक्षणिक मदत घेण्यापलीकडे त्यांच्या शिक्षकांकडे संपर्क साधला होता. या सर्वेक्षणात असे आढळले आहे की, 70 टक्के विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांकडून करीअर मार्गदर्शन घेत आहेत. गेल्या वर्षीच्या निष्कर्षाच्या तुलनेत यात यंदा 13 टक्के वाढ आहे. नवीन आवडीच्या क्षेत्रांचा शोध घेण्यापासून ते नवीन शैक्षणिक संधींचे सोनं करण्यासाठी विद्यार्थी सक्रियपणे त्यांच्या शिक्षकांकडे मार्गदर्शनासाठी आस लावून आहेत. 67 टक्के विद्यार्थ्यांना असे वाटते की ऑनलाइन शिक्षणामुळे आवश्यकतेनुसार त्यांच्या शिक्षकांशी संपर्क साधणे सोपे झाले आहे. ब्रेनलीचे मुख्य उत्पादन अधिकारी राजेश बिसाणी म्हणाले, 72 टक्के विद्यार्थी शाळांमध्ये परत येण्यास आणि त्यांचे शिक्षण नव्या उमेदीने पुढे नेण्यासाठी उत्सुक आहेत. बहुसंख्य विद्यार्थी वर्गात परत येण्याची वाट पाहत आहेत. याचे कारण म्हणजे त्यांना त्यांच्या सवंगडी तसेच शिक्षकांशी वैयक्तिक संवाद साधायचा आहे.