48 मेगापिक्सल कॅमेरा आणि 8 GB रॅम, AGM Glory स्मार्टफोन लॉन्च

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

AGM कंपनीचा नुकताच AGM Glory रग्ड स्मार्टफोन लॉन्च झाला आहे. या फोनमध्ये 5G जी असून 48 मेगापिक्सल कॅमेरा आणि 8 GB चा रॅमही देण्यात आला आहे. या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय कडाक्याच्या थंडीतही हा फोन चालणार आहे. उणे 27 अंश सेल्सियस तापमानातही हा फोन संपूर्ण दिवस चालू शकतो असा दावा कंपनीने केला आहे.

AGM Glory रग्ड स्मार्टफोनमध्ये लेटेस्ट अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 11 आहे. त्यात स्नॅपड्रॅगन 480 प्रोसेसर असून बॅटरीची क्षमता 6200mAh इतकी आहे.

फोनमध्ये 8 GBचा रॅम असून256 GB इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे. फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा कॅमेरा असून 20 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आल आहे.

हा फोन डोंगराळ आणि बर्फाळ प्रदेशातही तितक्याच क्षमतेचे चालेल असे कंपनीने म्हटले आहे. हा फोन उणे 27 अंश सेल्सियस तापमानात संपूर्ण दिवस स्टँडबाय चालू शकतो. तर उणे 30 अंश सेल्सियसमध्ये तीन तासाचा स्टँडबाय चालू शकतो. AGM Glory स्मार्टफोनची किंमत ३0 हजार रुपये इतकी आहे.