आत्मसमर्पणाच्या वाटेवरून नक्षलवादी मूळ प्रवाहात, वर्षभरात 8 नक्षलींच्या ‘नवजीवना’ला सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नक्षलवाद्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात सामील करून घेण्यासाठी राज्य सरकार विविध योजना राबवत आहे. नक्षल चळवळीतून नक्षलवाद्यांची संख्या कमी करण्यासाठी ‘आत्मसमर्पण योजना’ राबवण्यात येत असून मागील काही वर्षांत साडेपाचशेहून अधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यामुळे या योजनेला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागाने घेतला आहे.

राज्यात गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड जिह्याच्या काही भागांत नक्षलवाद्यांच्या कारवाया सुरू असतात. नक्षलवादी कारवायांना पायबंध घालण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने 25 ऑगस्ट 2005पासून नक्षलवाद्यांसाठी ‘आत्मसमर्पण योजना’ सुरू केली आहे. आत्मसमर्पण करणाऱया नक्षलवाद्यांना संघटनेतील त्यांच्या रँकप्रमाणे पाच हजारांपासून दहा लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस जाहीर करण्यात येते. हत्यारांसह आत्मसमर्पण करणाऱया नक्षलवाद्यांना दोन हजारांपासून दोन लाखांपर्यंतचे अतिरिक्त बक्षीस दिले जाते. तसेच त्यांच्या पुनर्वसनासाठी घर, शिक्षण,  रोजगारासाठी सरकार आर्थिक मदत देते. आत्मसमर्पणानंतर नक्षलवादी तरुणांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. या वर्षात आठ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण योजनेसाठी पोलिसांनी नवजीवन योजना राबवली होती. या योजनेची मुदत यंदाच्या ऑगस्ट महिन्यात संपली होती. पण याला मिळणारा प्रतिसाद पाहून गृह विभागाने ऑगस्ट 2023पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

…तर नक्षलवाद संपेल

राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे हे गडचिरोली जिह्याचे पालकमंत्री आहेत. गडचिरोलीत त्यांच्या हस्ते 27 कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ केला आहे. 46 वाहने व अॅम्ब्युलन्स, ऑक्ॊिसजन प्लांट व स्वीमिंग पूलचे लोकार्पण झाले. स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून दिल्यास नक्षलवाद संपेल, असा विश्वास यानिमित्ताने एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

पोलिसांचा फ्लॅग मार्च

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील संवेदनशील भागात रविवारी मुंबई पोलिसांनी फ्लॅग मार्च केला. धनजी स्ट्रीट येथून सुरू झालेला मार्च भेंडी बाजार, मुंबादेवीहून पुढे एल. टी. मार्ग पोलीस ठाणे येथे समाप्त झाला. रूटमार्चमध्ये शीघ्र कृती दलाचे 6 अधिकारी, 36 मेन, 1 वज्र गाडी, 1 बोलेरो, 1 जिप्सी, 1 बस तसेच एल. टी. मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदी सहभागी झाले होते.