अभियांत्रिकीच्या पहिल्या फेरीत 89 हजार 911 विद्यार्थ्यांना प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभियांत्रिकी प्रथम वर्ष प्रवेशातील पहिल्या फेरीत 89 हजार 911 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. ऑप्शन फॉर्म भरलेल्या 1 लाख 23 हजार 649 विद्यार्थ्यांपैकी अद्याप 33 हजार 738 विद्यार्थी वेंिंटगवर असून या विद्यार्थ्यांना या पुढील दोन कॅप राऊंडमध्ये प्रवेशाची संधी आहे.

राज्यात प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या सुमारे 1 लाख 28 हजार 124 जागांसाठी पहिल्या कॅप राऊंडपर्यंत अर्ज करणाऱयांना 4 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्या मुदतीत 1 लाख 29 हजार 286 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी पहिल्या कॅप राऊंडसाठी 1 लाख 23 हजार 649 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 89 हजार 911 विद्यार्थ्यांना प्रवेश अलॉट झाले आहेत. या विद्यार्थ्यांना 21 ऑक्टोबरपर्यंत प्रवेश पूर्ण करावे लागणार आहेत.

अभियांत्रिकी प्रवेशाच्या तीन फेऱया होणार आहेत. त्यापैकी पहिल्या तीन फेरीत सुरुवातीला दिलेल्या विकल्प यादीवर तर चौथ्या फेरीसाठी नव्याने विकल्प देण्याची विद्यार्थ्यांना संधी असणार आहे. त्यामुळे पहिल्या यादीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढे होणाऱया कॅप राऊंडमध्ये संधी उपलब्ध होणार आहे.

…तर प्रवेश घ्यावाच लागणार
ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत (ऑटो फ्रीझड्) पहिल्या पसंतीनुसार अभियांत्रिकीची जागा वाटप करण्यात आली आहे. अशा विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावाच लागणार आहे. त्यानंतरच्या होणाऱया प्रवेश फेरीत या विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. मात्र प्रथम पसंती व्यतिरिक्त अन्य पसंतीक्रम मिळाला आहे असे विद्यार्थी पुढील फेरीसाठी पात्र असणार आहेत. पुढील फेरीत अधिक चांगले महाविद्यालय मिळवण्यासाठी नॉट फ्रीझ पर्याय निवडला पाहिजे.

  • अर्ज केलेली अंतिम गुणवत्ता यादी 129286
  • पहिल्या कॅपसाठी पसंतीक्रम भरलेले 123649
  • पहिल्या कॅपसाठी पसंतीक्रम न भरलेले 5637
  • पहिल्या कॅपमधून प्रवेश अलॉटमेंट 89911
  • प्रवेश न मिळालेले 33738