
सामना प्रतिनिधी । मुंबई
व्हाय धिस कोलावेरी दी या गाण्याने सगळ्या तरुणाच्या गळ्यातील ताईत बनलेला अभिनेता धनुष आता मराठीत पदार्पण करीत आहे. धनुष हा रजनीकांत यांचा जावई आहे.
धनुषने आपल्या करिअरची सुरुवात गायक म्हणून केली होती. त्यानंतर तो साऊथचा सुपरस्टार झाला. रांझणा चित्रपटाच्या माध्यमातून त्याने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. रांझणा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला हिट ठरला होता. दाक्षिणात्य चित्रपट आणि बॉलिवूडनंतर धनुष आता मराठीमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे.
‘फ्लिकर’ या अमोल पाडवे दिग्दर्शित चित्रपटात धनुषने मराठीत गाणं गायले आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट म्हणजे या गाण्याला प्रसिद्ध संगीतकार इलायाराजा यांचे संगीत आहे. धनुष स्वत: इलियाराजा यांचा फॅन आहे. मंगेश कांगणेने हे गीत रचले आहे. धनुष याला मराठीमध्ये गाणं गाताना शब्दोच्चारात अडचण येऊ शकते हे लक्षात घेऊन मंगेश कांगणे याने सोपे शब्द असलेलं गाणं तयार केलं. चेन्नईत काही महिन्यांपूर्वी या गाण्याचं रेकॉर्डींग करण्यात आले. गाणे रेकॉर्ड करण्यासाठी सहा तास लागले.
























































